Khed सरपंचनामा न्यूज:माजी उपसभापती अमोलदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न ; महाळुंगे पंचायत समिती गणातील १०० गरजू कुटूंबाना मोफत किराणा वस्तूंचे वाटप

Spread the love

सरपंचनामा न्यूज|विवेक बच्चे
राजगुरूनगर:संपूर्ण जगावर ओढवलेलं कोरोना विषाणूचे संकट पाहता व भविष्यातील रक्ताचा होणारा तुटवडा लक्षात घेता, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री अमोलदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र येलवाडी यांच्या वतीने शुक्रवार दिनांक. २९ मे २०२० रोजी भागीरथी मंगल कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण रक्तदान शिबीर हे कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नियमांचे पालन करुन पार पडले. ह्या वर्षी वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम न घेता, फ्लेक्स न लावता सामाजिक बांधिलकी जपत व राज्य शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, तसेच महाळुंगे पंचायत समिती गणातील १०० गरजू कुटूंबाना मोफत किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले अशी माहिती श्री अमोल पवार ह्यांनी दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ह्या अगोदर ह्या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून गावांमध्ये फवारणी केली,आरोग्य विभागाच्या कर्मचार्याना थर्मल स्कॅनिंग यंत्र व पल्स ऑक्सीमीटर घेऊन दीले त्याचा वापर करून कर्मचार्यानी घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली असे अमोल पवार ह्यांनी सांगितले. रक्तदान शिबिरामध्ये एकूण ८० तरुणांनी रक्तदान केले. ह्या मध्ये स्वतः अमोलदादांनी व सांगुर्डी गावचे दोन्ही डोळ्यांनी अंध असणारे दिव्यांग तरुण संतोष दिलीप भसे व शिबीराला भेट द्यायला आलेले पोलिस कर्मचारी पप्पू लोखंडे ह्यांनी देखील रक्तदान करून माणुसकीचे वेगळे दर्शन घडवले. रक्तदान शिबीराला खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवानशेठ पोखरकर, पंचायत समिती सदस्य मच्छींद्र गावडे,श्रीनाथ लांडे, महाळुंगे पोलिस चौकिचे PSI चव्हाण साहेब, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक महेश पवार इत्यादींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी येलवाडी गावचे मा.उपसरपंच रणजित गाडे,युवक अमित बवले, जीवन बोत्रे व इतर समस्त ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *