Junnar सरपंचनामा न्यूज:जुन्नर तालुक्यातील कोरोना पाँझिटीव्ह रूग्णांची संख्या झाली २१ ; जुन्नर तालुक्यात शिरोली तर्फे आळे येथे आज नव्याने दोन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

Spread the love

सरपंचनामा न्यूज
नारायणगाव (किरण वाजगे)
जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे येथे आज नव्याने दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तालुक्यामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या २१ एवढी झाली आहे. यापूर्वी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उपचार घेत असलेला डिंगोरे येथील एक रुग्ण बरा झाला असून तालुक्यातील पूर्व भागातील औरंगपूर येथील एक जण २९ मे रोजी मृत्युमुखी पडला आहे.
जुन्नर तालुक्यामधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून सर्वत्र चिंता वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आणि विनाकारण घरा बाहेर फिरणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
आज दि. ३० मे अखेर सायंकाळी ७ वाजेपर्यंत रुग्णांची संख्या २१ एवढी झाली आहे. यामुळे सर्वांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार हनुमंत कोळेकर व गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी केले आहे.
श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून येथे कोरोना विषाणू बाधीतांवर उपचार करण्यात येत आहे. असे असले तरी तेथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची उणीव भासत आहे अशी तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली.
जुन्नर तालुक्यातील गाव निहाय कोरोणा रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे

डिंगोरे – १ रुग्ण (बरा झाला आहे)
सावरगांव – ५
खिलारवाडी – १
मांजरवाडी -२
पारूडें – २
आंबेगव्हाण – २
धोलवड – ३
धालेवाडी तर्फे मिन्हेर – १
औंरगपूर – १ मृत्युमुखी
विठ्ठलवाडी वडज – १
शिरोली तर्फे आळे २

एकुण – २१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *