Khed सरपंचनामा न्यूज:वादळाने उडाले धामणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ७ वर्गखोल्यांचे पत्रे ; जि.प.सदस्य शरद बुट्टे पाटलांनी तात्काळ भेट देऊन दिली दुरुस्तीची ग्वाही

Spread the love

सरपंचनामा न्यूज|विवेक बच्चे

पाईट:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणे येथील ७ वर्गखोल्यांचे छत आज दुपारी ४ वाजता झालेल्या चक्री वादळामध्ये पूर्णपणे उडुन गेले.
या वादळामुळे शाळेच्या वरहांड्यातील कॉलम तूटले आहेत .छताचे पत्रे आणि लोखंडी अँगल वादळाने उडून गावाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन पडले आहेत. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. गावातील एका चार चाकी वाहनावर पत्रे पडल्यामुळे तिचे थोडे नुकसान झाले आहे.वादळ मोठे असल्याने व पाऊस असल्याने ग्रामस्थ घराचे दरवाजे बंद करून घरात बसल्यामुळे जीवित हानी झाली नाही.
येथील ग्रामस्थ ग्रामशिक्षण समिती आणि शिक्षकांच्या मेहनतीतून अतिशय स्वच्छ सुंदर बोलकी करण्यात आली होती.
आजच्या वादळाने झालेल्या नुकसानीमुळे ७ ही वर्गातील शैक्षणिक साहित्य, संगणक संच, ५ led tv, शालेय पुस्तके, ब्लॅक बोर्ड व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच मी,शिवाजी डावरे, विस्तार रोहिदास रामाने,मुख्याध्यापक धर्मराज पवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली.गावातील तरुणांनी शाळेचे उडालेली छताचे पत्रे व साहित्य एकत्र गोळा केले.
जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी लगेचच ग्रामसेवक आणि तलाठी यांना फोन करून सकाळी १० वाजेपर्यंत पंचनामा तयार करण्याचे आणि शाखा अभियंता यांना दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.
सदर कामाला तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *