Khed सरपंचनामा न्यूज:संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा प्रमुख पदी योगेश देसाई यांची निवड

Spread the love

सरपंचनामा न्यूज|दिनेश कुऱ्हाडे

आळंदी देवाची : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख पदी योगेश देसाई यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, आज सकाळी १० वा. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी भक्त निवास येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, अजित कुलकर्णी व योगेश देसाई उपस्थित होते असे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले यावेळी उपस्थित सर्व विश्वस्तांनी योगेश देसाई यांच्या नावावर एकमत दर्शवित त्यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड केली, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान १३ जून रोजी असून कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने प्रस्थान सोहळा पार पाडून पालखी दशमी पर्यंत आळंदीतच वास्तव्यास असेल आणि दशमीला विमान किवा वाहनातून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *