Junnar सरपंचनामा न्यूज:जुन्नर तालुक्यातून कोरोनाबाबत दिलासादायक बातमी ; लेण्याद्री येथील कोविड 19 चाचणी सेंटरमधील दिनांक ३२ मे रोजी दाखल केलेल्या ३५ रुग्णांचे कोरोणा चाचणी अहवाल निगेटिव्ह

Spread the love

सरपंचनामा न्यूज

विभागीय संपादक|किरण वाजगे
नारायणगाव:श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे सुरू करण्यात आलेल्या covid-19 तपासणी सेंटर मध्ये दिनांक 31 मे रोजी तपासणीसाठी पाठवण्यात झालेल्या पस्तीस जणांचे कोरोणा चाचणी अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. या सर्व जणांना घरी सोडण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे अशी माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर व नवनियुक्त गट विकास अधिकारी हेमंत गरिबे यांनी दिली.
दरम्यान नारायणगाव येथे मुंबईहून आलेल्या एका वृद्ध व्यक्ती चा कोल्हेमळा येथे कोरोना सदृश्य आजाराने काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या घरातील संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींचे रिपोर्ट हे देखील निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे नारायणगावकरांना मोठा दिलासा मिळाला असून कोरोना बाबतच्या भीतीचे सावट तूर्त तरी कमी झाले आहे.
जुन्नर तालुक्यातील कोरोणा बाधित रुग्णांची संख्या आज अखेर बावीस एवढी झाली असून यापैकी तीन रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी दिली कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेली आठ दिवस बंद असलेली नारायणगावची बाजारपेठ आजपासून मात्र सकाळी सात ते दुपारी दोन या दरम्यान ग्राहकांसाठी खुली करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *