Shirur सरपंचनामा न्यूज : कोरोगाव भिमात आढळला कोरोना रुग्ण

Spread the love

कोरेगाव प्रतिनिधी सुनील भंडारे पाटील

राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असतानाच कोरेगाव भीमा सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये कोरोनाने शिरकाव केला. गावात कोरोना रुग्न सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे १९ मार्च पासून ३६ दिवसांचा सर्वात मोठा लॉक डाऊन घेतल्याने पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येच्या गावाला कोरोनापासुन संरक्षित ठेवण्यास कृती समितीला यापूर्वी यश आले होते. कोरेगाव भीमामध्ये संचारबंदीच्या काळातही ‘आयो जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती दिसून येत होती. गावामध्ये मुंबई पुण्यासह इतर भागातुन तीनशे पेक्षा जास्त लोक खुले आम येत असुनही मोजक्याच लोकांना होम कॉरन्टाईन करण्यात आले आहे.

गावात पंचक्रोशीतील आठ ते दहा गावातील नागरिक दररोज येत असल्याने गावात संचारबंदीचा फज्जा उडाला होता. तर २४ मे रोजी कोरेगावातील एका इसमाला श्वसनाचा त्रास झाल्याने कोरेगावातील एका खाजगी रुग्नालयात व त्यांनतर तेथून वाघोलीतील खाजगी रुग्नालयात अ‍ॅडमीट करण्यात आले होते. २६ तारखेस त्याला रुग्नालयातून सोडण्यात आले. दरम्यान त्याचे स्वॅब घेण्यात आल्यानंतर त्यानंतर त्याचे कोरोनाची टेस्ट पॉझीटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे.

तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. विराज भंडलकर, आरोग्य परीवेक्षक जालिंदर मारणे व कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्व्हे करण्यास प्रारंभ केला. तसेच कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच प्रकाश ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी गाव निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली असुन कामगार तलाठी अश्विनी कोकाटे, पोलीस पाटिल मालन गव्हाणे यांनी परिसराची पाहणी करुन गावातील व्यवहार बंद ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *