Khed सरपंचनामा न्यूज:शेलगावच्या सरपंचपदी रंजीत हांडे यांची बिनविरोध निवड

Spread the love

सरपंचनामा न्यूज|विवेक बच्चे

शेलपिंपळगाव:शेलगाव (ता.खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रणजीत सुभाष हांडे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्यांमधून ही निवड करण्यात आली.पीठासीन अधिकारी विजय घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.सरपंच पदासाठी रंजीत हांडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विजय घुगे, ग्रामविकास अधिकारी एस डी.शिंदे व तलाठी सारिका विटे यांनी रंजीत हांडे यांना बिनविरोध विजयी घोषित केले.यावेळी उपसरपंच स्वामीनाथ पवार,ग्रामपंचायत सदस्य कैलास आवटे,अलकाबाई आवटे,बाळूबाई आवटे,सुरेखा आवटे,सपना क्षीरसागर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.नवनिर्वाचित सरपंच रंजीत हांडे यांचा यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *