Shirur सरपंचनामा न्यूज:लॉक डाऊन नंतर कोरेगाव भीमा परिसरातील अनेक कंपन्या सुरू ; ऍलीविंड आर्चीटिलर प्रा. ली. कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत अल अमीन कॉलेजमध्ये आसऱ्याला आलेल्या 100 लोकांना दिले जेवण

Spread the love

सरपंचनामा न्यूज
विभागीय संपादक|सुनिल भंडारे पाटील

कोरेगाव भीमा :
लॉक डाऊन नंतर कोरेगाव भीमा व परिसरातील अनेक कंपन्या काही प्रमाणात सुरू झाल्या असून येथील कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कंपनी प्रशासनच्या वतीने विविध प्रकारची सुरक्षा उपकरणे दिली आहेत.
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील ऍलीविंड आर्चीटिलर प्रा. ली. या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत येथे अल अमीन कॉलेज मध्ये आसऱ्याला आलेल्या तब्बल 100 लोकांना एकवेळ चे जेवण देण्या बरोबरच आपल्या कामगारांना लॉक डाऊन मुळे कंपनी बंद असून ही मागील दोन महिन्याचा पूर्ण पगार देत कामगारांना कोरोना चा प्रादुर्भाव व संसर्ग होऊ नये यासाठी त्यांची कंपनीच्या आवारात तात्पुरती रहाण्याची व्यवस्था करण्यात आली. तर कंपनी सुरू होताना त्यांचे दररोज तापमान चेक करून त्यांना मास्क, ग्लोज, शूज, गॉगल्स आदी सुरक्षिततेच्या वस्तू देण्यात आले असल्याचे कंपनीचे प्रमुख जगमोहन काबरा, मुरलीमनोहर काबरा, राजेश काबरा यांनी सांगितले. तसेच यासाठी प्रवीण उत्तमराव गव्हाणे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *