Khed सरपंचनामा न्यूज:लोककलावंतांना केंद्र व राज्य सरकारने आर्थिक मदत व खास अनुदान जाहिर करावे – लोक कलावंतांची मागणी

Spread the love

सरपंचनामा न्यूज|सुनील ओव्हाळ पाटील

शेलपिंपळगाव वार्ताहर; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावच्या ग्रामदैवतांचे यात्रांचे कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याने तमाशा फडातील हजारो कलावंत उपासमारीचे जीवन जगत आहेत. तर पुणे जिल्यातील धानोरी गावचे झंकार कलाकेंद्रासह सुमारे तेरा कलाकेंद्र बंद असल्याने संगीत पार्ट्यांतील लोककलाकारांचे अतोनात हाल सुरू आहेत. लोककलाकारांची उपासमार थांबविण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने या लोक कलावंतांना प्रामुख्याने वार्धक्याकडे झुकलेल्या लावणी गायिका , नृत्यांगना तसेच प्रत्येक लोककलाकारांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच शासन मान्यता असलेल्या संगीत पार्टी मालकीण यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खास अनुदान जाहिर करावे. असे धानोरी झंकार लोकनाट्य कला केंद्राचे थिएटर मालक शिवाजी परांडे ,व्यवस्थापिका मंदा पारगावकर , ज्येष्ठ लावणी गायिका कमल धोंडराईकर यांनी वार्तालाप करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोरोना विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी सर्वत्रच लॉकडाऊन करण्यात आले आहे. ३१ जूलै २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढले आहे.
राज्यभरातील कलाकेंद्रांसह पुणे जिल्यातील कलाकेंद्र बंदच राहतील. असे चित्र दिसून येत आहे. खेड तालुक्यातील त्रिमूर्ती कलाकेंद्र तर हवेली तालुक्यातील धानोरीचे झंकार कलाकेंद्र , पुण्यातील आर्यभूषण , शिरूर तालुक्यातील पूजा व अंबिका कलाकेंद्र तर दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील कला केंद्रात आपल्या उपजिविकेसाठी तर लोककला जीवंत ठेवण्यासाठी काहींनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. तसेच संगीत पार्टीत आपली कला सादर करणाऱ्या लावणी गायिका , नृत्यांगना , हार्मोनियम वादक , ढोलकी वादक , तबला वादन करणारे लोककलाकार हे परंपरेनुसार ही लोककला सादर करणारे कोल्हाटी समाजातील आहेत. पंचवीस ते तीस वर्षांमध्ये डोंबारी तर अल्पसंख्यांक वर्गातील नृत्यांगना , लावणी गायिका , पारंपारिक वाद्ये वाजविणारे लोककला जोपासणाऱ्या या शेकडो कलाकारांनी लॉकडाऊन दरम्यानच्या काळात सुमारे चार महिने उलटले आहेत. ते आपला गाशा गुंडाळून गावाकडे गेले आहेत. हे कलाकार खूपच हलाखीचे जीवन कंठीत असल्याचे कमल धोंडराईकर , मंदा पारगावकर , सारिका धोंडराईकर तसेच झंकार थियटरचे मालक शिवाजी परांडे यांनी फोनद्वारे वार्तालाप करताना सांगितले.
८ जून २०२० पासून हॉटेल , देशी , विदेशी दारूची दुकाने सुरू झाली आहेत. हॉटेल चालक , दारूच्या दुकानदारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम अटींचे बंधन घातले आहे. त्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम अटींचे बंधन घालून कलाकेंद्र सुरू केली तर शेकडो लोककलाकारांची उपासमार थांबेल. अशा भावना जेष्ठ लावणी गायिका कमल धोंडराईकर , मंदा पारगावकर , सारिका धोंडराईकर व शिवाजी परांडे यांनी फोनद्वारे वार्तालाप करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. चार ते पाच महिने कलाकेंद्रे लॉकडाऊनच्या काळात बंद असल्याने प्रत्येक लोककलावंतांना आर्थिक मदत तर संगीतपार्टी मालकीण यांना खास अनुदान राज्य व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने जाहीर करावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *