Junnar सरपंचनामा न्यूज:जुन्नर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या झाली १४४ ; नारायणगावात आज एक कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न ; ७२ रूग्ण बरे होऊन घरी ; ६९ रुग्ण ऍक्टिव्ह

Spread the love

सरपंचनामा न्युज
नारायणगाव/किरण वाजगे
नारायणगाव – वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आज दुपारी आलेल्या अहवालानुसार आज दिनांक १२ जुलै रोजी नारायणगाव येथे एक कोरोणा बाधित तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
आज अखेर जुन्नर तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण १४४ एवढी झाली आहे. आजपर्यंत ७२ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून एकूण ६९ अँक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी हेमंत गरीबे यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी निष्पन्न झालेल्या नारायणगाव येथील पेठ आळी मधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या मोठ्या मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे या कुटुंबामध्ये एकूण तीन सदस्य कोरोना बाधीत झाले आहेत.
या घटनेमुळे नारायणगाव मध्ये सतर्कता बाळगण्याची गरज असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी केले.
दरम्यान नारायणगाव येथील अत्यावश्यक सेवा उद्या म्हणजेच दिनांक १३ जुलैपासून सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती सरपंच योगेश पाटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *