Ambegaon सरपंचनामा न्यूज:थोरांदळे येथे कर्तव्य बजावणाऱ्या ग्रामसेकास शिवीगाळ दमदाटी व मारहाण ; मंचर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Spread the love

सरपंचनामा न्यूज
विभागीय संपादक|वैभव काळे पाटील

आंबेगाव:संपुर्ण देशात कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव चालू असताना सदरचा प्रादुर्भाव रोखणे कामी लॉक डाऊन चे काळात जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकनारे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश केला आहे.
त्या प्रमाणे आज दिनांक १३/०७/२०२० रोजी थोरांदळे येथिल चौकात दंडात्मक कारवाई करत असताना नितीन मिंडे ह्या इसमाने कोणाच्या आदेशाने दंडात्मक कारवाई करत आहात तो आदेश दाखवा असे म्हणून हातवारे करून शिवीगाळ करू लागला असता पोलिस नाईक कदम ह्यांनी सांगितले की तुमची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल करा तर सदर इसमाने तुम्ही मध्ये बोलू नका असा दम भरला.
सरकारी कामात असुन कर्तव्य बजावत आहे असे सांगितले तरीही माझी शर्टाची कॉलर धरून हाताने मारहाण केली असता सोबत असलेल्यांनी त्यांना सोडवले असता मी सी ई ओ साहेबांना फोन करून तुमची नोकरी घालवतो अशी धमकी देऊन शिवीगाळ करत निघून गेल्याची तक्रार थोरांदळे गावचे ग्रामसेवक नवनाथ गायकवाड ह्यांनी मंचर पोलिस स्टेशनला दिली असुन नितीन मारुती मिंडे ह्या इसमाविरुध भा.द.वी.कलम ३५३, १८६, ३२३, ५०४, ५०६, ८८, २६९, ५१ तसेच आपत्ती व्यवस्थापन २,३,४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खबाले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *