Ambegaon सरपंचनामा न्यूज:मंचर येथिल मोरडे फूड्स मध्ये पावणेदोन लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी मंचर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Spread the love

सरपंचनामा न्यूज
विभागीय संपादक|वैभव काळे पाटील

आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळील सुप्रसिद्ध कॅडबरी उत्पादक मोरडे कंपनी मध्ये २५/०६/२०२० ते १२/०७/२०२० रोजी रात्रीचे वेळी भिंतीचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून पॅनल रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात इसमां कडून जबरी चोरी करण्यात आली आहे.
मोरडे कंपनी मध्ये एच आर अधिकारी म्हणून काम करत असलेले मुदस्सर रज्जाक शेख हे घरी असताना सिक्युरिटी सूपरवायझर अनिल गायकवाड यांनी फोन वरून माहिती दिल्यानंतर तिथे गेले होते.त्या ठिकाणी सचिन मधुरवार, महेश गुंगणे, पवन कडुसकर हेही तिथे उपस्थित होते त्यावेळी कंपनीचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांना अनोळखी ३ ते ४ इसम चोरी करणारा आढळुन आले.
मुदस्सर रज्जाक शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध प्रकारच्या केबल व कटर साहित्य असे एकुण १,७३,०००/- रुपये किमतीचे समान चोरीस गेल्याने अज्ञात ३ ते ४ चोरट्यांविरुद्ध भा.द.वी. कलम ४५७, ३८०, ३४ प्रमाणे मंचर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *