Pune सरपंचनामा न्यूजःपुणे जिल्ह्य़ातील कोविड-१९ ग्रस्त गंभीर रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देण्याचे सामाजिक काम करणाऱ्या डॉ.विजय गोकुळे यांचे या आजारातून बरे झालेल्या नागरिकांना प्लाझा दान करण्याचे आवाहन

Spread the love

सरपंचनामा न्यूज।विवेक बच्चे

चाकणःचाकण येथील गोकुळे हॉस्पिटलचे संचालक डाॅ. विजय गोकुळे मागील १५ वर्षांपासून महाराष्ट्रातील गरजु रुग्णांना रक्त मिळवून देण्याचे काम करीत आहेत.मागील एक महिन्यापासून पुणे जिल्ह्य़ातील कोविड-१९ ग्रस्त गंभीर रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देण्याचे कामही ते सामाजिक बांधिलकी म्हणून करत आहे.
सध्या कोविड-१९ ग्रस्त गंभीर रुग्णांना उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे.वाय सी एम हाॅस्पिटल पिंपरी येथील ब्लड बँकेत कोणत्याही रक्तगटाच्या प्लाझ्मा डोनर्सची नितांत गरज आहे. फक्त तो प्लाझ्मा डोनर हा कोविड-१९ पाॅझिटिव्ह होऊन २८ दिवसांचा कालावधी झालेला व बरा झालेला असावा.
सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन कोणी प्लाझ्मा दाता प्लाझा दान करू इच्छित असेल तर त्यांनी वाय सी एम ब्लड बँकेत सकाळी १० ते ५ या वेळेत प्लाझ्मा डोनेशनसाठी जाण्याचे आवाहन डॉ.विजय गोकुळे यांनी केले आहे.
यासाठी संपर्क – आम्रपाली मॅडम – वाय सी एम ब्लड बँक पिंपरी – मो. नं. +919637271011
किंवा
– डॉ विजय गोकुळे
9822314914
जीते जीते रक्तदान…जाते जाते देहदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *