Junnar सरपंचनामा न्यूज:जुन्नर तालुक्यात आज २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न ; तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या झाली ४४९

Spread the love

सरपंचनामा न्यूज

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून आज रोजी एकूण २३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निष्पन्न झाले आहेत. आजपर्यंत जुन्नर तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या ४४९ एवढी झाली असून आजपर्यंत १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.यापैकी २८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४६ एवढी आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
आज जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये २३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. गाव निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे..
नारायणगाव ३,
वडगाव कांदळी ६,
सांगणोरे १,
तेजुर २,
रोहोकडी १,
राजूरी १,
भोरवाडी २.
पारूंडे १,
शिंदे राळेगण ६,
असे एकूण २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
दरम्यान सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *