Junnar सरपंचनामा न्यूज:कुसुर येथील तलाखी ठाकर वस्तीवरील गरीब व गरजू कुटुंबाना रुपश्री महिला विकास संस्थेच्या वतीने मोफत धान्य किट वाटप

Spread the love

सरपंचनामा न्यूज

जुन्नर /आनंद कांबळे
कुसुर ता जुन्नर येथील तलाखी ठाकर वस्तीवरील गरीब व गरजू कुटुंबाना रुपश्री महिला विकास संस्थेच्या वतीने मोफत धान्य किट वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी नवले यांनी दिली. कोरोनाच्या कालावधीत गरीब व गरजू नागरिकांना आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी वस्तीवरील 50 कुटुंबाना मोफत गहू, तांदूळ तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कुसुर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र भगत, मारुती ढोबळे, गोरक्ष नवले, महेंद्र भगत, संयोग शेलार, पंकज शेलार, गोरख मोधे, संतोष मोधे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. रुपश्री संस्थेच्या वतीने पश्चिम आदिवासी भागात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. कोरोना काळातही संस्थेच्या वतीने विविध गावामध्ये महिलांच्या मदतीने मास्क तयार करून मोफत वाटप करण्यात आले आहे. संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे वस्तीवरील नागरिकांनी अभिनंदन केले.

तलाखी, कुसुर येथील ठाकरवाडी वस्तीवर मोफत धान्याचे किट वाटप करतांना राजेंद्र भगत, अश्विनी नवले व अन्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *