Pune सरपंचनामा न्यूज:निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कार्यकारीणी सल्लागार समिती सदस्यपदी प्राचार्य डॉ.कैलास नरहरी बवले यांची नियुक्ती

Spread the love

सरपंचनामा न्यूज|विवेक बच्चे

पुणे:प्राचार्य डॉ.कैलास नरहरी बवले हे गेली 30 पेक्षा जास्त वर्षे उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.सुरुवातीस संगमनेर येथे अर्थसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 13 वर्षे काम केले त्यादरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रकल्प अधिकारी म्हणून 7 वर्षे काम पाहिले. त्यावेळी विद्यार्थी बरोबर घेऊन पाणलोट क्षेत्र विकास कामे तसेच वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षणाचे कार्य केले.अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा ग्रामीण विकास प्रकल्पात उपयोग केला.पुढे नारायणगाव महाविद्यालयात 12 वर्षे संस्थापक प्राचार्य तसेच हरी सहस्त्रबुद्धे माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्थेचे संचालक मगणूनही काम केले.उच्च शिक्षण व ग्रामीण विकास संकुल प्रकल्पाची आखणी व अंमलबजावणी केली.उच्च शिक्षणाला ग्रामीण विकासाशी जोडण्याचे विविध उपक्रम राबविले त्यामध्ये महाविद्यालयात ग्रासम विकास केंद्राची स्थापना.समाज संशोधन केंद्र असे परिसर विकासाचे उपक्रम राबवून महाविद्यालयास खऱ्या अर्थाने समाज महाविद्यालय अशी ओळख निर्माण करून दिली.25 वर्षे उच्च शिक्षणात सेवा दिल्यानंतर त्यांनी समाज कार्यासाठी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली.पुढे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नियंत्रणात कार्य कारणाऱ्या राज्य साधसन केंद्राचे ते चार वर्षे संचालक होते.येथेही साक्षर भार्स्ट अभियान खेडोपाडी पोहचविण्यासाठी नावतंत्रज्ञान वापरून आभासी अभ्यास वर्ग सुरू केले.औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाचा समन्वय घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले.पुढे प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉपम्पुटर सायन्स सांगावी येथे प्राचार्य तसेच प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे संचालक म्हणून तीन वर्षे काम पाहिले.शिक्षणाला शाश्वत ग्राम विकासाशी जोडण्यासाठी त्यांनी नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजनेची निर्मिती केली.सद्या गोखले अर्थशास्त्र संस्था या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेत(अभिमत विद्यापीठ,पुणे) स्थापन केलेल्या डॉ.धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्राम विकास केंद्राचे समन्वयक म्हणून सेवाभावी काम करत आहेत.आपल्या गावचे व समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी स्वग्रामी ग्राम विकासासाठी युवा संघटन केले.त्यातून ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने गावातील जलसंधारणाचे मोठे काम उभे राहिले.गावाचा ग्राम विकास आराखडा तयार करणे, तसेच विकास कामामध्ये त्यांचे नेहमीच मार्गदर्शन असते.त्यांना यापूर्वी शांतिदुत परिवाराचा महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार,देश पातळीवरील नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड 2003,बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया गोल्ड मेडल 2016,भारत रत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड 2017,
साई बालाजी ग्रुप ऑफ एज्युकेशन, पुणे जीवन गौरव पुरस्कार,इ.पुरस्कार प्राप्त आहेत.जीवन प्रबोधिनी ट्रस्ट,पुणे या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.शाश्वत ग्राम विकासाची नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोग योजना व त्यातून निर्माण होत असलेली” ज्ञान ग्राम-शाश्वत ग्राम” चळवळ ही त्यांची महत्वाची देण आहे.या कामाची दखल घेऊन
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ(महाराष्ट्र)या राज्य स्तरीय संस्थेने त्यांची राज्य कार्यकारीणी च्या सल्लागार समिती सदस्य पदी नियुक्ती केली आहे.त्याबद्दल त्यांचे,शिक्षण क्षेत्र,पर्यावरण,ग्राम विकास तसेच समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *