Khed सरपंचनामा न्यूज:१५ ऑगष्टच्या आत पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील कलाकेंद्रे सुरू करण्यात यावीत – ज्येष्ठ नृत्यांगना व लावणी गायिका कमल व सारिका धोंडराईकर यांची मागणी

Spread the love

सरपंचनामा न्यूज|सुनिल ओव्हाळ पाटील

शेलपिंपळगाव , दि. १ ( प्रतिनिधी ) संगीत पार्टीच्या माध्यमातून लोककलेची आराधना करीत लोककला जिवंत ठेवण्याचे काम दुर्लक्षित व उपेक्षित समाजातील कोल्हाटी , डोंबारी व अल्पसंख्यांक समाजातील लावणी नृत्यांगना , लावणी गायिका तर लोककलाकार , राज्यभरातील कलाकेंद्रात आपली कला सादर करून लोककला जोपासण्याचे काम करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील व राज्यभरातील सर्वच कलाकेंद बंद आहेत. लोककलेच्या माध्यमातून कुटुंबाची उपजिविका साधणाऱ्या लोककलावंतांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. १५ ऑगष्टच्या आत पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील
कलाकेंद्रे सुरू करण्यात यावीत. अशी मागणी ज्येष्ठ नृत्यांगना व लावणी गायिका कमल व सारिका धोंडराईकर यांनी सर्व लोककलावंतांच्या वतीने केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील कलाकेंद्रे पाच महिन्यापासून
बंद आहेत. लावणी गायिका , नृत्यांगना , तसेच प्रत्येक संगीत पार्टीतील ढोलकी , हार्मोनियम , तबला वादक , सोंगाड्या तर संगीत पार्टीत स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिला यांची उपासमार होऊ लागल्याने राज्य शासनाच्या व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने या लोककलावंतांची उपासमार होऊ नये. यासाठी प्रत्येक संगीत पार्टीतील कलाकारांना राज्य सरकारने शासनाचा निधी उपलब्ध करून द्यावा. तात्काळ कलाकेंद्रे सुरू करून उपेक्षित लोककलाकारांची होणारी उपासमार थांबविण्यात यावी. अशी मागणी
कमल-ज्योती धोंडराईकर संगीत पार्टीच्या मालकीण ज्येष्ठ गायिका व नृत्यांगना कमल धोंडराईकर यांनी केली आहे.
प्रामुख्याने वंश परंपरेनुसार कोल्हाटी समाजातील तसेच अलीकडच्या काळात डोंबारी , अल्पसंख्यांक जाती धर्मातील नृत्यांगना , गायिका तसेच प्रत्येक संगीत पार्टीत आपली कला सादर करणारे ढोलकी , हार्मोनियम , तबला वादक , सोंगाड्या बैठकीच्या लावणीतून लोककला प्रकारातील लावणी नृत्य , लावणी गायन , हार्मोनियमचे मंजुळ सूर तर ढोलकीचा खणखणाट तर तबला वादनाचा थरथराट करीत एक तासाच्या बैठकीतून प्रत्येक कला केंद्रात रसिकांच्या आवडीनुसार कला सादर करून रसिकांचे मनोरंजन करून आपले पोटपाणी भागवितात. गेल्या पाच महिन्यापासून कोरोना या भयावह आजाराचे संकट ओढवल्याने राज्यभरातील सुमारे ५२ तर पुणे जिल्ह्यातील १३ कलाकेंद्रे बंद असल्याने तमाम लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे ज्येष्ठ नृत्यांगना व गायिका कमल धोंडराईकर यांनी वार्तालाप करताना सांगितले.
कमल धोंडराईकर यांनी सांगितले की , संगीत पार्टीत लोककला जीवंत ठेवण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा समावेश , पारंपारिक लावणी गायन , लावणीनृत्य , पारंपारिक पद्धतीची वेशभूषा परिधान करून , लोककलेच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करतात. लावणी रसिकांनी लावलेल्या बैठकीत मुजरा , गवळण , फक्कड लावण्यांचा समावेश तर बैठकीची लावणी , छक्कड , चित्रपटातील लावण्या हे लोककलेतील कला प्रकार सादर केले जातात. यावर रसिकजन आमच्या कलेची कदर करीत बैठकीचे पैसे देतात. जेवढ्या बैठका होतील. त्यात संगीत पार्टीत असलेल्या नृत्यांगना , गायिका , ढोलकी , तबला , पेटीवादक , सोंगाड्या यांना हिश्याप्रमाणे त्यांची बिदागी दिली जाते. थिएटर मालकाला प्रत्येक बैठकीची अर्धी रक्कम द्यावी लागते. प्रत्येकाच्या वाट्याला बैठकी झाल्यास दोनशे ते अडीचशे रुपये येतात. त्यावर खावटी व कुटुंबातील लोकांचा उदरनिर्वाह होतो. त्यात मुलांबाळांचे शिक्षण , आजारपण असा खर्च असतो. कोरोना विषाणूचा संसर्ग त्याचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी राज्य सरकारने कलाकेंद्रे बंद केल्याने शेकडो कलाकार हलाखीचे जीवन आपल्या गावाकडे जगत आहेत. संगीत पार्टीतील नृत्यांगना व लोककलाकारांना शासनाची मदत मिळाली नाही. या उपेक्षित व दुर्लक्षित लोककलावंतांसाठी शासन दरबारी न्याय मागणारे खूप कमी आहेत. आज रोजी आम्हा कलाकारांची उपासमार होऊ लागल्याने संगीत पार्टीतील प्रत्येक कलाकारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिने कलाकेंद्रे बंद असल्याने प्रत्येकी पंचवीस हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर राज्य व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने मदतनिधी म्हणून जमा करावेत. अशी मागणीही ज्येष्ठ नृत्यांगना व लावणी गायिका कमल धोंडराईकर यांनी यांनी केली आहे. लवकरात लवकर पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील कलाकेंद्रे सुरू करावीत. लोककलाकार , लावणी गायिका , नृत्यांगना यांची होणारी उपासमार थांबावी. यासाठी १५ ऑगष्टच्या आत कलाकेंद्रे सुरू करण्यात यावीत. अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नृर्त्यांगणा व गायिका कमल धोंडराईकर यांनी केली आहे.
पाच महिने संगीत पार्टी बंद असल्याने प्रत्येक संगीत पार्टीला राज्य व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने खास अनुदान जाहिर करावे. अशीही मागणी राज्यभरातील संगीत पार्टी मालकीण यांच्या वतीने कमल धोंडराईकर यांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *