Mumbai सरपंचनामा न्यूज:कोरोनामुळे मरण पावलेल्या दोन्ही पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी -महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची मागणी

Spread the love

सरपंचनामा न्यूज़: गोरख चौरे
मुंबई:(प्रतिनिधि) लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी आणि गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले यांचे कोरोनाचा उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले आहे सरकारने आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्या बरोबर पत्रकारांनाही कोरोना काळात कर्तव्यावर असताना विमा कवच दिले जाईल असे शासनाने जाहीर केले होते त्यानुसार कोरोना महामारी च्या काळामध्ये दोन्ही पत्रकार मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयाचे विमा कवच अंतर्गत मदत करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे महाराष्ट्र मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांना सरकारने 50 लाख रुपयांचा विमा कवच जाहीर केले होते प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जीव धोक्यात घालून वार्तांकन करत असल्यामुळे विमा कवच देण्यात यावे अशी मागणी राज्य पत्रकार संघाचे पत्रकारांनी लावून धरली होती याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या काळात दुर्दैवाने बाधा होऊन पत्रकार यांचे निधन झाल्यानंतर त्यांनाही विमा संरक्षण अंतर्गत कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा केली होती जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांनी मयत पत्रकार असल्याचे घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची भूमिका स्पष्ट केली होती सरकारच्या या निर्णयाचे सर्व पत्रकारांनी स्वागत केले होते या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील गेवराई येथील दैनिक सामना वृत्तपत्रात पंचवीस वर्षे तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार संतोष भोसले वय 48 यांचा दिनांक 28 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला तर लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी वय 61 यांचा दिनांक 29 जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला त्यामुळे या दोन्ही पत्रकारांचा कोरणा मुळे मृत्यू झाला असल्याने शासनाने घोषित केल्या प्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे राज्य संघटक संजय भोकरे प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे प्रदेश कार्याध्यक्ष राकेश डोळे किरण जोशी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *