Pune सरपंचनामा न्युज : लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी नम्रता सरकाटेचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

सरपंचनामा न्युज | विवेक बच्चे

भोसरी:राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी(भोसरी पुणे)येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कु.नम्रता सरकाटे लॉक डाऊनच्या काळात आपल्या मूळ गावी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नलगानापूर( भोरटेक) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन सामाजिक कार्यात आपले योगदान देत आहे .महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर या विद्यार्थिनीने एक प्रकारे आदर्श निर्माण केला आहे .तिच्या या कौतुकास्पद कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.विलास शेठ लांडे, प्राचार्य डॉ. गौतम भोंग , रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा .दीपक पावडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा .सविता वीर आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *