Khed सरपंचनामा न्युजःखेड तालुका १८ व १९ सप्टेंबर रोजी होणार संपूर्ण लॉकडाउन ; खेड तालुक्यातील सर्व नागरिकांची होणार कोरोना चाचणी – आ.दिलीप मोहितेंची माहिती

Spread the love

सरपंचनामा न्युज । विवेक बच्चे

राजगुरूनगरः खेड तालुक्यात होत असणारा कोरोनाचा उद्रेक लक्षात घेऊन कोरोनाला अटकाव करण्यासाठी येत्या १८ व १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण खेड तालुक्यात लॉकडाउन करण्यात येणार असल्याची घोषणा खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी केली.
यापूर्वी १५ व १६ सप्टेंबरला संपूर्ण खेड तालुका लॉकडाउन करण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलपोळा हा सण १७ तारखेला असल्यामुळे बैलपोळ्याची तयारी करायला शेतकऱ्यांना अडचण येईल हे लक्षात घेऊन या तारखा बदलून बैलपोळा सण झाल्यावर १८ व १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण खेड तालुक्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी घेतला आहे.
या दोन दिवसांच्या काळात संपूर्ण खेड तालुक्याची कोरोना चाचणी करण्याचे नियोजन करण्यात आले असून यावेळी सगळ्यांनी घरीच राहून सर्वेक्षण व चाचणी करण्यासाठी येणाऱ्या आरोग्य पथक व स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी यांना सहकार्य करण्याचे आवाहन आ.दिलीप मोहिते यांनी केले आहे.
कोरोना हा आजार लपवला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात प्रसंगी मृत्यूचा पण सामना करावा लागु शकतो त्यामुळे वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.वेळीच उपचार केले तर आजारातून खात्रीने बरे होता येते.रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे,रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात आहे,ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटरची संख्याही कमी पडत आहे.व्हेंटिलेटर व ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. मधुमेह व त्यासारखे अनेक किरकोळ आजार असे आहेत की,त्यासाठी पण आपण चाचणी करून औषधे घेत असतो अगदी त्याचप्रमाणे आपण कोरोना चाचणी केली तर चुकून कोणाला कोरोनाची बाधा झाली असल्यास वेळीच उपचार केल्याने आपण या आजारातून पूर्ण बरे होऊ शकतो म्हणून १८ ते १९ सप्टेंबर या दोन दिवसांत संपूर्ण खेड तालुक्यात जनता कर्फ्युच्या माध्यमातून संपूर्ण खेड तालुक्याची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सर्वांना या चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन आ.दिलीप मोहिते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *