Shirur सरपंचनामा न्युज : शिक्रापूर पोलिसांकडून वढू बुद्रुक येथे विनामास्क दुचाकी धारक व पादचाऱ्यांवर कारवाई

Spread the love

सरपंचनामा न्युज

कोरेगाव-भीमा प्रतिनिधी सुनील भंडारे पाटील
वढू बुद्रुक तालुका शिरूर आणि परिसरामध्ये सद्यस्थितीत वाढता कोरोणाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशन व ग्रामस्थ यांच्यावतीने विनामास्क दुचाकी धारकांवर व पादचाऱ्यावर कारवाई करण्यात आली त्यामुळे लोकांना काही वेळातच मास्क वापरण्याची सवय लागली यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार ए.एस. आय. पुनाजी जाधव साहेब आणि वढू बुद्रुक गावचे पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांनी मास्क चे महत्व लोकांना पटवून दिले
या परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेलि असून वडू बुद्रुक गावापासून पुढे आपटी आणि वाजेवाडी तसेच वाजेवाडी चौफुला पिंपळे जगताप आणि गावांना जोडणाऱ्या वडू गावातील रस्त्या वर लोकांची खूप वर्दळ असते गेल्या कित्येक दिवसापासून कोरोना या महामारीने धुमाकूळ घातलेला आहे परंतु त्याचे गांभीर्य या भागामधील लोकांमध्ये दिसत नाही मास्क वापरता फिरणे गर्दी करणे या गोष्टीं च्या मुळे संसर्ग वाढत चालल्याचे लक्षात आले त्यामुळे ग्रामस्थांनी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या सहकार्यातून वढू बुद्रुक मुख्य चौकामध्ये विना मास्क व गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली विना मास्क दुचाकी व विना मास्क पाई फिरणाऱ्या लोकांकडून 200 रुपये दंड वसूल करण्यात आला व त्यांना मास्कचे महत्त्व पटवून सांगण्यात आले पोलिसांच्या या कारवाईबद्दल लोकांकडून आभार मानण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *