Haveli सरपंचनामा न्यूज : आव्हाळवाडी ग्रामपंचायच्या उपसरपंचपदी राजकन्या सागर आव्हाळे पाटील यांची बिनविरोध निवड

Spread the love

कोरेगाव भीमा : प्रतिनिधी सुनिल भंडारे पाटील
आव्हाळवाडी, ता. हवेली येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच राजकन्या सागर आव्हाळे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच अश्विनी पंकज आव्हाळे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ललिता चंद्रकांत आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. उपसरपंच पदासाठी राजकन्या आव्हाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक तुकाराम पाटील यांनी राजकन्या आव्हाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी हवेली पंचायत समिती सदस्य नारायण आव्हाळे, अशोक सहकारी बँकेचे संचालक संदेश आव्हाळे, माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे, माजी उपसरपंच देविदास आव्हाळे, विक्रम कुटे, अलका सातव, ग्रामपंचायत सदस्य राहुल सातव, शरद आव्हाळे, काकासाहेब सातव, अतुल शिंदे, मंदा सातव, उषा सातव, अनिता आव्हाळे, तुकाराम आव्हाळे, राजेश आव्हाळे, नितीन आव्हाळे, तुषार राजू आव्हाळे, मयूर आव्हाळे, आकाश आव्हाळे, सागर आव्हाळे, प्रमोद आव्हाळे, तात्यासाहेब आव्हाळे, महेंद्र कुटे, नवनाथ आव्हाळे, सुनील सातव, दत्तात्रय आव्हाळे, रितेश आव्हाळे, तुषार आव्हाळे, अरविंद सातव, अमोल आव्हाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच राजकन्या आव्हाळे यांचा संदेश आव्हाळे युवा मंच यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राजकन्या आव्हाळे यांनी गावातील अंतर्गत ड्रेनेज लाईन व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ते आदी विकास कामे मार्गी लावणार असून नागरिकांनी कोरोना च्या काळात सॅनिटायझर व मास्क वापरत असताना विनाकारण बाहेर फिरण्यापेक्षा घरात राहुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आव्हाळे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *