Khed सरपंचनामा न्यूजःखेड-आळंदी विधानसभा मतमोजणी तयारी पूर्ण ; आवश्यक सूचनांचे पालन करण्याचे पोलिस प्रशासनाकडून आवाहन

Spread the love

सरपंचनामा न्यूज।विवेक बच्चे

राजगुरूनगरःनुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली आहे.सगळीकडे मतमोजणीची प्रतीक्षा सुरू आहे दिनांक 24.10. 2019 रोजी विधानसभेचा निवडणुक निकाल जाहीर होणार असून त्या अनुषंगाने सहाय्यक निवडणूक अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी खेड विभाग खेड तसेच पोलीस निरीक्षक खेड यांचे उपस्थितीत मीटिंग घेण्यात आली सदर मिटिंग मध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत.आवश्यक सूचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस व प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. 1.वेताळेश्वर चौक गणपती मंडळ, तिन्हेवाडी रोड,क्रीडा संकुल रोड हे रोड सकाळी सहा वाजल्यापासून ते मतदान निकाल होईपर्यंत बंद करण्यात येणार आहेत. 2. सातकर स्थळ रोडच्या डाव्या बाजूने पार्किंग करावी. 3. कॅनॉलचे बाजूला व थिगळस्थळ मधील क्लासिक नेस्ट अपार्टमेंट येथे हे निकाल ऐकण्याची व वाहनांची पार्किंग साठी सोय करण्यात येणार आहे. 4. कॅनॉलचे पाणी बंद करण्याच्या बाबतीत संबंधित विभागास सूचना करण्यात आलेली आहे. तसेच पट्टीचे पोहणारे, लाईफ जॅकेट ,आणि बोटीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 5. थिगस्थळ शासकीय विश्राम गृहाचे समोरील हायवे रोड च्या बाजूला खाजगी वाहनांनी पार्किंग करावी . 6.तसेच शासकीय कर्मचारी यांनी थिगळ स्थळ येथील मोकळ्या पार्किंग जागेमध्ये वाहने पार्किंग करावी. शासकीय कर्मचारी यांची क्रीडासंकुल ते पार्किंग व्यवस्था येथे जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय करण्यात आलेली आहे. 7.उमेदवारांची आणि शासकीय कार्यालयांमधील वरिष्ठ अधिकारी यांची वाहने फक्त क्रीडा संकुल पर्यंतच आत जातील. मतदार व कार्यकर्ते यांच्यासाठी पार्किंग व्यवस्था — पुणे नाशिक हायवे रोड मार्ग येणारे मतदार व कार्यकर्ते यांनी मार्केट यार्ड राजगुरूनगर व पुणे नाशिक हायवे लगत पार्किंग करावी. 8.वाडा रोड मार्गे येणारे मतदार व कार्यकर्ते यांनी महात्मा गांधी विद्यालय येथील मोकळ्या जागेत तसेच तिन्हेवाडी रोड मार्गे येणारे लोक यांनी श्री कैलास सांडभोर यांच्या मोकळ्या जागेत वाहने पार्किंग करावीत तसेच दिनांक 24 10 2019 रोजी वेताळेश्वर ते तिन्हेवाडी रोड सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत बंद करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी सर्व बंदोबस्तासाठी खेड पोलीस स्टेशन तर्फे हे 15 पोलीस अधिकारी 120 पोलीस आरसीपी पथक स्पेशल टास्क फोर्स ठेवण्यात आलेला आहे असे उपविभागीय कार्यालय खेड यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *