(Khed) सरपंचनामा न्यूजः- खेड मध्ये दिलीप मोहिते विजयी ; सेनेच्या सुरेश गोरेंचा दारुण पराभव

Spread the love

सरपंचनामा(News ऽ Business info) संतोष पारधी।विभागीय संपादक

वाकी बुद्रुक(ता.खेड):-खेड आळंदी विधानसभा मतदार संघात राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील हे ३३ हजार २४२ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेचे सुरेश गोरे यांचा दारुण पराभव केला.पुणे जिल्ह्यात अत्यंत चुरशीची ठरलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.परंतु झालेल्या तिरंगी लढतीमध्ये अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्या मतविभाजनाचा फटका सेनेच्या सुरेश गोरेंना याना बसला, युती असती तर विजय निश्चित होता असे काही उद्गार सेनेच्या गोटात झालेली पहावयास मिळाली. खेड-आळंदी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते पाटील, शिवसेनेचे सुरेश गोरे, अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्यात तिरंगी लढत झाली. यामध्ये अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी १६व्या फेरीपर्यंत चांगलीच लढत दिली. निवडणुकीत सुरेश नामदेव गोरे-शिवसेना, दिलीप दत्तात्रय मोहिते-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नितीन अंबादास गवई-बसपा, हिरामण रघुनाथ कांबळे-वंचित बहुजन आघाडी, चेतन तुकाराम पाटील-हमारी अपनी पार्टी, सुबोध लक्ष्मण वाघमारे-बहुजन मुक्ती पार्टी, अतुल महादेव देशमुख-अपक्ष, अनिकेत मुरलीधर गोरे-अपक्ष, पांडुरंग महाराज शितोळे-अपक्ष हे उमेदवार रिंगणात होते एकूणच एक ते २८ फेऱ्यां मध्ये दिलीप मोहिते पाटील यांनाच आघाडी मिळत राहिल्याने त्यांनी शिवसेनेचा दारुण पराभव केला. खेड आळंदी विधासभा मतदार संघातील उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे:- १)दिलीप दत्तात्रय मोहिते-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- (९६,८६६मते विजयी), 2)सुरेश नामदेव गोरे -शिवसेना (६३,६२४ मते), ३)अतुल महादेव देशमुख-अपक्ष(५३,८७४मते), ४)नितीन अंबादास गवई-बसपा(८७२मते), ५)हिरामण रघुनाथ कांबळे-वंचित बहुजन आघाडी(१,७४० मते), ६)चेतन तुकाराम पाटील (४३७ पक्ष), ७)सुबोध लक्ष्मण वाघमारे-अपक्ष(३५६मते), ८)अनिकेत मुरलीधर गोरे-अपक्ष (५९२ मते), ९)पांडुरंग महाराज शितोळे-अपक्ष(६४७ मते) नोटा – १,७१७ मते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *