Pune सरपंचनामा न्यूज:पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही

Spread the love

सरपंचनामा न्यूज|दिनेश कुऱ्हाडे

पुणे : महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात , पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेचा एकही विधानसभेत आमदार नाही तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे हेच एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आहे, शिरुर लोकसभा मतदारसंघात खेड आळंदी विधानसभा, जुन्नर विधानसभा, आंबेगाव विधानसभा हे तीन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सुरेश गोरे यांचा पराभव भाजपचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहीते पाटील यांच्या कडून पराभव पत्करावा लागला, जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रबळ इच्छुक असलेल्या आशा बुचके यांची उमेदवारी लोकसभा निवडणुकीत मनसेचे आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशा मुळे कापली गेली त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार शरद सोनवणे यांना आशा बुचके यांच्या बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनकेने यांच्या कडून पराभवाचा सामना करावा लागला आणि आंबेगाव विधानसभा निवडणुकीत प्रथमच शिवसेने मार्फत निवडणूक लढविणारे प्रा. राजाराम बाणखिले यांचा ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या पूढे निभाव लागू शकला नाही तर हडपसर मध्ये भाजपचे विद्यमान आमदार असल्याने ती जागा भाजपला सोडली तर भोसरी मतदारसंघात अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भाजप मधे प्रवेश केल्याने लोकसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सर्वाधिक मतदान भोसरी विधानसभा मतदारसंघातून मिळाले होते त्यामुळे ती जागा भाजपला सोडण्यात आली. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार असल्याने तिथे एकही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतरे हे गेली दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मत विभागणी मुळे ते आमदार झाले यंदा अजित पवार यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला दिला आणि काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांच्या समवेत झालेल्या लढतीत राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव झाला अजित पवार यांनी आखलेल्या व्यव्हरचनेला यश आले , तर भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या कडून अतितटीच्या लढतीत दुसऱ्यांदा पराभूत झाले, इंदापूर ची जागा शिवसेनेकडे होती पण तिथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला त्यामुळे हि पण जागा भाजपला सोडण्यात आली , तर पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुस्कवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या कडून पराभव पत्करावा लागला अशा प्रकारे शिवसेनेला प्रथमच विधानसभा निवडणुकीत पराभवामुळे शून्यावर समाधान मानावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *