Khed सरपंचनामा न्युज :निधन वार्ता| माऊलींचे सेवक चोपदार कृष्णराव रंधवे गुरुजी यांचे निधन

Spread the love

सरपंचनामा न्युज
आळंदी / प्रतिनिधी  : संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सेवक चोपदार , आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे शाळा क्रमांक १ मधील सेवानिवृत्त शिक्षक , पालखी सोहळ्यात प्रदीर्घ काळ सेवारत असताना वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव रंधवे ( चोपदार गुरुजी वय ८३ वर्षे  ) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी ( दि १६ ) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सेवारत परिवार आहे. 

 माऊलीचे पालखी सोहळ्यात त्यांनी प्रदीर्घ काळ सेवा केली. माऊली मंदिरात चोपदार गुरुजी यांनी सेवा करीत विविध संस्थाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. मराठा सेवा संघाचे माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे काम केले. आम्ही वारकरी संस्थेचे प्रमुख राजाभाऊ चोपदार, बांधकाम व्यावसायिक रामभाऊ चोपदार, शिवस्फुर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. शैलजा मोळक (चोपदार ) ,पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या सहाय्यक शिक्षण विभाग प्रमुख शिल्पकला रंधवे यांचे ते वडिल आणि पुणे महापालिकाचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांचे ते सासरे होत. शोकाकुल वातावरणात  श्रीचे सेवक चोपदार गुरुजी यांचे पार्थिवावर येरवडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तीर्थक्षेत्र आळंदी व वारकरी संप्रदायात गुरुजींचे जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *