Khed सरपंचनामा न्युजःशेलपिंपळगाव येथे पुरात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

Spread the love

सरपंचनामा न्युज । विवेक बच्चे
शेलपिंपळगावः शेलपिंपळगाव- मोहितेवाडी(ता.खेड)येथील शिवकृपा पेट्रोल पंपाजवळील ओढ्यावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या जनार्दन शांताराम डिंबर (वय ४७ वर्षे रा.चिखली,पुणे)या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसादरम्यान दुचाकीस्वार जनार्दन शांताराम डिंबर हे रात्री पावणेबाराच्या सुमारास ओढा ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात पुराच्या पाण्यात वाहून गेले.पुराच्या पाण्यात शिरण्याचे अतिधाडस दुचाकी स्वाराच्या जीवावर बेतले.चाकण पोलीस स्टेशनच्या गस्त पथकाकडून रात्री त्यांचा शोध घेण्यात आला.घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर दुचाकी(एम एच १४ एच एस ५६५५) मिळून आली.दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना मृतदेह मिळून आल्याचे चाकण पोलीसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *