Ambegaon सरपंचनामा न्युज : माजी विद्यार्थी संघटनेतर्फे चिंचोली येथील जगदीशचंद्र महिंद्रा विद्यालय व वस्तीगृहाला सॅनिटायर स्टॅन्ड आणि साहित्य भेट

Spread the love

सरपंचनामा न्यूज | विवेक बच्चे

आंबेगाव:”कर्तव्य नव्हे तर जबाबदारी”या उक्तीप्रमाणे आत्ता हा कोरोना प्रादुर्भाव काळ चालू आहे आणि यामध्ये सर्वांनी स्वतःबरोबरच सर्वांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून आपल्या आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकणे गावच्या ‘श्री कपालेश्वर एज्युकेशन सोसायटी’ संचालित जगदीशचंद्र महिंद्रा विद्यालय आणि वस्तीगृहला सॅनीटायझर स्टँड तसेच सॅनिटायझर कॅन, बॉटल सह इतर साहित्य माजी विद्यार्थी संघ मित्र परिवाराच्या वतीने आज जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री विजय हगवणे (सर) यांच्याकडे सुपूर्त केले, या वेळी आपल्या विद्यालयाचे शिक्षक माननीय श्री आनंद सर कोकणे त्याचबरोबर वस्तीगृहाचे व्यवस्थापक माननीय श्री संदिप सर कोकणे हे देखील उपस्थित होते. यावेळी संघाचे सल्लागार व मार्गदर्शक मा.श्री.तुकाराम कोकणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शाळेमध्ये, वस्तीगृहामध्ये काही ना काही कारणास्तव आपले शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व इतर स्टाफ सह विद्यार्थी आणि पालक येत असतात आणि त्यांच्या सर्वांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य अर्थात जबाबदारी आहे आणि म्हणून या मित्र परिवाराने पुढाकार घेऊन शाळेला चार सॅनिटायझर स्टॅन्ड सह काही वस्तू घेऊन दिलेले आहे तरी मी या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा देतो आणि आपल्या शाळेच्या प्रती असलेल्या भावना पुन्हा एकदा आपण जागृत केल्या त्याबद्दल सर्वांचे पुन्हा मनःपूर्वक आभार/धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच कार्य आपल्याकडून नेहमी होत राहो, अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *