Khed सरपंचनामा न्यूज:श्री ज्ञानेश्वर विद्यालयाकडून अनाथाश्रमाला मदतीचा हात

Spread the love

सरपंचनामा न्यूज|दिनेश कुऱ्हाडे

सामाजिक बांधिलकी जपत श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थी सहाय्यक समिती अंतर्गत एक हात मदतीचा या उपक्रमाद्वारे संस्था, शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून निर्मल बालग्राम अनाथाश्रमच्या मुलांना दीपावली निमित्त मदतीचा हात

आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात बरोबरच सामाजिक ऋण व सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली जाते. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी सहाय्यक समिती अंतर्गत एक हात मदतीचा या उपक्रमाद्वारे संस्था, शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून रोख रक्कम व वस्तू स्वरुपात त्यामध्ये धान्य व किराणा मालाचे साहित्य स्विकारण्यात आले. दिपावली सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत असताना विद्यार्थी सहाय्यक समिती अंतर्गत एक हात मदतीचा या उपक्रमातून जी मदत जमा झाली ती निर्मल बालग्राम अनाथ आश्रम ठाकूर पिंपरी खेड याच्या प्रमुख गीता सावंत यांच्याकडे सुपूर्द केली. या अनाथाश्रम मध्ये जवळपास 30 मुले मुली आहेत. याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्‍थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य गोविंद यादव, उपमुख्याध्यापक सिद्धनाथ चव्हाण, पर्यवेक्षक दिपक मुंगसे, सूर्यकांत मुंगसे, किसन राठोड, शिक्षक प्रतिनिधी विद्या नवले , शिक्षकेतर प्रतिनिधी संगीता पाटील , प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे,विद्यार्थी सहाय्यक समिती प्रमुख नीता गांधी आदी उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. दिपावली निमित्त कलाशिक्षक दत्तात्रय वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आकर्षक आकाश कंदील बनवून घेतले व या आकाशकंदिलांची प्रशालेच्या भव्य इमारतीस सजावट केली त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.प्रशालेतील स्वच्छता कर्मचारी यांचा दिपावली निमित्त मिठाई देवून सत्कार करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *