Khed सरपंचनामा न्यूजः’सुरेशभाऊ’चा आता सुरेशभाई होणार ; दिवाळी फराळ कार्यक्रमात माजी आ.सुरेश गोरेंचे कार्यकर्त्यांना बळ देणारे भाषण

Spread the love

सरपंचनामा न्यूज।दिनेश कुऱ्हाडे
चाकण :महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांना भाजपचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहीते पाटील यांच्या कडून पराभव पत्करावा लागला. गेली पाच वर्षे ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तालुक्यातील आम जनतेसाठी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दिवाळी फराळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो पण यावेळी हा कार्यक्रम आयोजित होणार कि नाही यावर साशंकता निर्माण होत होती.परंतु आम जनतेच्या प्रेमापोटी दिवाळी फराळ हा कार्यक्रम कायम सुरू राहणार असल्याचे शिवसेनेचे पराभूत उमेदवार माजी आमदार सुरेश गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
पुढे आपल्या भाषणात माजी आमदार सुरेश गोरे म्हणाले की,मी आमदार म्हणून पराभूत झालो असलो तरी तुम्ही नाराज होऊ नये.आपल्या पराभवासाठी मित्रांनच आपला घात केला,कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा याचच सर्वांना वाईट वाटत. माझ्या खेड तालुक्यातील आम जनतेसाठी मी कालपर्यंत तुमच्या साठी सुरेशभाऊ गोरे होतो आता आजपासून सुरेशभाई गोरे असणार आहे,आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी काल ही आजही आणि उद्याही तुमच्यासाठि सक्रिय राहणार आहे.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील , पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य किरण मांजरे, गणेश कवडे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, रामदास धनवटे,विजय शिंदे,साहेबराव कड, चाकण,राजगुरूनगर आणि आळंदी नगरपरिषद मधील शिवसेनेचे नगरसेवक,शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या दिवाळी फराळ कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *