सरपंचनामा न्यूज:मंथन फाउंडेशन व रिलीफ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आधार कार्ड शिबिराचे आयोजन

Spread the love

सरपंचनामा न्यूज
पुणे:मंथन फाउंडेशन व रिलीफ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठ, पुणे येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आधार कार्डचे शिबिर घेण्यात आले व पोस्टाचे बचत खाते उघडण्यात आले. 155 महिलांनी याचा लाभ घेतला.
मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी सांगितले की वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी संस्था आधार कार्ड सोबतच, रेशन कार्ड काढणे, मतदान ओळखपत्र, बचत खाते उघडणे व संजय गांधी निराधार योजना अनुदानसाठी संस्था मदत करत आहे.
यावेळी उपस्थित आशा भट्ट, अध्यक्षा, मंथन फाउंडेशन, रिलीफ फाऊंडेशन अध्यक्ष अनिल बोरकर, संस्थेचे कार्यकर्ते वृषाली गोरे, श्रीराम देशपांडे, आरती गणुरे, गणेश खेडेकर, मेरी डिसोझा, वैशाली ओव्हाळ, आरती आंग्रे, मोनिका कांबळे, डॉ. अभिजीत कांबळे, डॉ. चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.
विशेष सहकार्य श्री. नेमाडे सर ( वरीष्ठ पोस्ट मास्टर), श्री. दिवेकर( पब्लिक रिलेशन ऑफिसर) व ऑपरेटर विनायक इंगळे, पुणे जिल्हा पोस्ट ऑफिस. तसेच मार्गदर्शन जिल्हा रुग्णालय व पुणे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्था व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था.
मंथन फाउंडेशन
7350016571
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!