सरपंचनामा न्यूज:भोसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

Spread the love

सरपंचनामा न्यूज
शेलपिंपळगाव:भोसे(ता.खेड)येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भोसे येथील उद्योजक ॲड. बुधाजी धोंडीबा लोणारी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी नवीन ध्वजस्तंभ बांधून दिला.स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच विजय काळे यांनी भूषवले. ध्वजाचे ध्वजारोहण ॲड. बुधाजी धोंडीबा लोणारी यांच्या हस्ते करण्यात आले.स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्ती गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी तसेच जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. मार्गदर्शक शिक्षिका नंदा शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळ बक्षीस दिले.
यावेळी उपसरपंच विश्वास गांडेकर, ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच दिगंबर लोणारी , लंकाबाइ कुटे,मिनाताई लोणारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास गांडेकर,उपाध्यक्ष दिगंबर कुटे,सदस्य मुचकुंद जाधव, सुप्रियाताई पिंगळे तसेच इतर मान्यवर, महिलावर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सुनीता कोळपकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विवेकानंद गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अंकुश सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!