सरपंचनामा न्यूज : वडगाव घेनंद येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

Spread the love

सरपंचनामा न्यूज
शेलपिंपळगाव:वडगाव घेनंद (ता.खेड)येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
निवृत्त सैनिक अधिकारी व विधवा महिला यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले व त्यानंतर वडगाव घेनंदच्या लोकनियुक्त सरपंच शशिकला वैभव घेनंद यांच्या हस्ते नारळ फोडून ध्वज फडकवण्यात आला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री शरदचंद्र विद्यालय येथे विविध प्रकारच्या शालेय स्पर्धा घेण्यात आल्या.स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. श्री शरदचंद्र विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच निवृत्त व सेवेत असलेले सैनिक अधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व गावातील एक किंवा दोन मुली असणाऱ्या महिलांना ‘कन्यारत्न समृद्धी पुरस्कार’ देण्यात आला. व त्यानंतर गावातील सर्व विभागातील प्रशासकीय व शैक्षणिक सेवेत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा ‘गुणगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री रमेश नारायणराव पवार यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच शशिकलाताई घेनंद यांनी सर्वांचे आभार मानले. शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या उपस्थित
यावेळी सरपंच शशिकला घेनंद, उपसरपंच विठ्ठल थोरात , ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच संतोष यादव, हेमा घेनंद ,उज्वला घेनंद नीता घेनंद ,संतोष गांधीले ,अमोल नितनवरे ,योगिता बवले ,शुभांगी बवले , ग्रामसेविका सारिका वाडेकर व ग्रामपंचायत कर्मचारी विजय बवले व गोरक्ष बवले ,गावातील सर्व प्रशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!