सरपंचनामा न्यूज:क्षितिज प्रोडक्शनच्या सहकार्याने विश्वास राजे थोरात यांचं म्होरं या म्होरं या…गणपती बाप्पा म्होरं या…हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Spread the love

सरपंचनामा न्यूज

पुणे:वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वासराजे थोरात यांचे म्होरं या म्होरं या गणपती बाप्पा म्होरं या हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला…

मी मुंबई येथे नेमणुकीस असताना सन २०१३ मध्ये मला “लालबागचा राजा”* येथे गणेशोत्सवानिमित्त बंदोबस्त ड्युटी लागली होती. त्यावेळी दिवसभर होणारी गर्दी पाहून व गणरायाच्या उद्घोषणा ऐकून ऐकून गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी दि.१७/९/२०१३ रोजी मला गणरायाला साकडे हे काव्य अर्थात गीत सुचले. ते मी तेथेच एका बाजूला खुर्चीवर बसून अर्ध्या तासामध्ये लिहून पूर्ण केले. “लालबागचा राजा” च्या शेजारीच अनेक वृत्तपत्रांची कार्यालये आहेत. मंडळाचे काही कार्यकर्ते व माझ्या हाताखालील पोलीस अधिकारी यांनी सदर वृत्तपत्र कार्यालयांमध्ये माझे हे गीत झेरॉक्स काढून नेऊन दिले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी अनेक वृत्तपत्रांमध्ये हे गीत छापून आले. विशेषतः “दैनिक वार्ताहर” ने त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्ती मध्ये हे गीत छापले. त्यावेळी याला खूप प्रसिद्धी मिळाली होती.
आता सुमारे ९ वर्षांनी त्या गीताचे गाणे बनवून गणेश भक्तांसमोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे. त्यावेळच्या परिस्थितीनुसार हे गीत लिहिले गेले होते. आता त्यामध्ये काही बदल करून विशेषतः कोरोना संबंधी नवीन कडवे तयार करून हे गीत बनवण्यात आले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गणरायाला आवाहन करण्यात आले आहे की, म्होरं या म्होरं या, बाप्पा म्होरं या, गणपती बाप्पा म्होरंया..
कशाप्रकारे बाप्पाने यावे, हे सुरुवातीला सांगितल्यानंतर अतिरेक्यांना नष्ट करण्यासाठी, कोरोनाने हतबल लोकांना धीर देण्यासाठी, महापूराने हैराण आणि आत्महत्या करणारे शेतकरी यांना सावरण्यासाठी विविध अवजारे अर्थात शस्त्रे घेऊन “म्होरं यावे” असे आवाहन या गाण्यामध्ये गणरायाला करण्यात आले आहे.
सदर गाणे हे “क्षितिज प्रोडक्शन्स” पुणे यांच्या वतीने बनवण्यात आले असून मी स्वतः गीतकार व संगीतकार आहे. हे गाणे सुप्रसिद्ध गायक आणि “शंभूराजे” या मालिके मधील टायटल सॉंग गाणारे संदीप उबाळे यांनी गायले असून मेलडी मेकर्स स्टुडिओचे सुप्रसिद्ध साऊंड रेकॉर्डिस्ट योगेश कांबळे यांनी संगीत संचलन केले आहे. त्यामधील कोरस मी स्वतः तसेच ओंकार थोरात आणि हर्षद तलावडे यांनी दिला आहे. एनडी 9 स्टुडिओचे तनवीर सय्यद यांनी संकलन केले असून क्षितिज थोरात यांनी तांत्रिक विश्लेषक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या गाण्याची निर्मिती “क्षितिज प्रोडक्शन्स” च्या निर्मात्या सौ. कल्पना थोरात यांनी केली आहे.
यापूर्वी मी “छत्रपती शिवरायांची” जगामधील पहिली व्हिडिओ महाआरती बनवली असून “सुंदरा आली” ही लावणी तयार केली आहे. तसेच मध्यंतरी “खरेदी” नावाची गझल क्षितिज प्रोडक्शन्स वर आलेली आहे. आणि आता “गणरायाला साकडे” हे गीत अर्थात गाणे सादर करीत आहे. त्या दरम्यान इतरही छोट्या-मोठ्या विविध साहित्य कृती साकारल्या आहेत. येत्या कार्तिकी एकादशीला “ती ही माऊली कृपाळू, तिला देऊया झोपाळू” हा खूप वर्षांपूर्वी लिहिलेला अभंग प्रदर्शित करण्याचा मानस आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!