सरपंचनामा न्यूज:खेड पूर्व भागात गणेशमूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी

Spread the love

सरपंचनामा न्यूज
शेलपिंपळगाव प्रतिनिधी:खेड पूर्व भागात शेलपिंपळगाव येथील गणेश मुर्ती काखान्यांवर व दुकानांवर गणेश मूर्ती खरेदिसाठी भाविकांची गर्दी दिसून आली.
विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या गणेशमूर्तींमद्धे लालबाग,दगडूशेठ,हरीण,फेटेवाला,सिंहासन,गरुड गणपती,जास्वंद,पान,सूर्यफूल डमरू,मूषक आदी आसनांवरील गणपतीला यावर्षी चांगली मागणी आहे. यावर्षी शहरी भागात गणेश मूर्तींच्या किंमतीत तीस ते चाळीस टक्के अशी मोठी वाढ झाली असूनही पारंपारिक कुंभार व्यवसाय करणाऱ्या शेलगाव येथील श्री गणेश व दुर्गा माता कारखान्याचे मालक गणेश माळशिरसे,मनिष माळशिरसे यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत फार मोठी भाव वाढ न केल्याने शेलगाव येथील आकर्षक व सुबक गणेशमूर्ती खरेदीसाठी पिंपरी चिंचवड,भोसरी,आळंदी, चाकण,राजगुरुनगर सह खेड पूर्व भागातील गावच्या भाविकांनी रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने व पावसाने उघडीप दिल्याने मोठी गर्दी केली.
अधिक माहितीसाठी संपर्क गणेश माळशिरसे +91 9623704539

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!