सरपंचनामा न्यूज:कोयाळी येथे आईच्या स्मरणार्थ गावासाठी स्वर्गरथाचे लोकार्पण

Spread the love

सरपंचनामा न्यूज

शेलपिंपळगाव:कोयाळी-भानोबाची(ता.खेड)येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल भानुदास आल्हाट व दीपक भानुदास आल्हाट यांनी त्यांची आई स्व.कमल भानुदास आल्हाट यांच्या स्मरणार्थ गावासाठी स्वर्गरथाचे लोकार्पण केले.
स्वर्गीय आईच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त राहुल आल्हाट व दिपकशेठ यांनी सामाजिक बांधिलकी जपत भानोबा देवाच्या आरती वेळी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर वैकुंठ रथाचे पूजन करून लोकार्पण केले. यावेळी सरपंच सतीश भाडळे, उपसरपंच सुनीता पांढरे, ह.भ.प.राजाराम आल्हाट, भाऊसाहेब आल्हाट, ग्रा.पं.स.अशोक लडकत, विकास भिवरे,देवीदास गायकवाड, राजू भाकरे,संदीप गायकवाड,राष्ट्रवादी सरचिटणीस सोमनाथ गायकवाड, सोसायटी संचालक भरत आल्हाट,बबन कोळेकर ,संदीप देंडघे,माजी सरपंच गणेश कोळेकर,अनिल दिघे,भानोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर,उपाध्यक्ष संभाजी भाडळे,सचिव बाळासाहेब येधुजी कोळेकर माजी उपसरपंच बाप्पू सरोदे ,हौसीराम दिघे, बाबुराव कोळपे,चेअरमन तुकाराम टेंगले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!