सरपंचनामा न्यूज:चाकण येथे ७५ व्या अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय ग्रेडींग परीक्षेचे आयोजन

Spread the love

सरपंचनामा न्यूज
चाकण : आंतरराष्ट्रीय गणित महामंडळ, तैवान, आयोजित ७५ वी अबॅकसची आंतरराष्ट्रीय ग्रेडींग परीक्षा रविवार दि.१८ सप्टेंबर २०२२ रोजी चाकण येथील संतोष ऑल रॉऊंडर अँकॅडमी या मान्यताप्राप्त सेंटर येथे आयोजित केली आहे.
या परीक्षेला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून १०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. चाकण सेंटरमधून ८९ विद्यार्थी अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय ग्रेडींग परीक्षेला बसले आहे.चाकण येथील संतोष ऑल रॉऊंडर अँकॅडमीच्या सर्व सेंटरमधून आणि चाकण येथील सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना ३ मिनिटांमध्ये गणिताची १० ते ३० कठीण उदाहरणे सोडवायची असतात. या ८९ विद्यार्थ्यांचा परीक्षेचा सराव मुख्य सेंटर, संतोष ऑल रॉऊंडर अँकॅडमी येथे दि. २८ ऑगस्ट पासून विशिष्ट पद्धतीने रोज एक तास सुरू आहे. रोज सरावामध्ये विद्यार्थ्यांकडून संगीत ध्यान घेतले जाते. ३ मिनिटांचा वेळ लावून पेपर सोडविला जातो. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून २०० पेक्षा जास्त पेपर सोडवून घेतले जातात.
अबॅकसमुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, आकलन क्षमता, ग्रहण क्षमता आणि अभ्यासाचा वेग ५० ते ८० पटीने वाढतो. गणित सोपे होते. गणिताची भीती जाते, या कोर्समुळे विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार होतात. अबॅकस कोर्स हा एकूण ९ लेव्हलचा २ वर्षांचा सर्टिफिकेट कोर्स आहे. सन २०१२ पासून असे विविध १० प्रकारचे कोर्सेस चाकण येथे संतोष ऑल रॉऊंडर अँकॅडमीच्या माध्यमातून शिकविले जातात. आजपर्यंत चाकण पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला आहे. या परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची निवड जून २०२३ च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी होईल.अशी माहिती आंतरराष्ट्रीय गणित महामंडळाचे महाराष्ट्र विभागाचे प्रमुख अकॅडेमीचे डायरेक्टर डॉ. प्रवीण आघाव आणि मुख्य प्रशिक्षक आणि परीक्षा विभागाच्या प्रमुख आदर्श प्राचार्या पुरस्कार विजेत्या प्रा. अर्चना आघाव यांनी दिली. मा. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, सर्व पालक वर्ग, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालक आदीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!