सरपंचनामा न्यूज:वाफगाव येथील पाझर तलावाचे निर्मलाताई पानसरेंच्या हस्ते जलपूजन

Spread the love

सरपंचनामा न्यूज
शेलपिंपळगाव : वाफगाव(मांदळेवाडी ता.खेड) येथील पूर्ण क्षमतेने भरलेल्या पाझर तलावाचे जलपूजन नुकतेच मा.जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई सुखदेव पानसरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई सुखदेव पानसरे यांच्या निधीतून छोटे पाटबंधारे विभागाकडून ३२ लाख रुपयाच्या निधीतून काही महिन्यांपूर्वी वाफगाव येथील पाझर तलाव दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या पाझर तलावाचे जलपूजन सौ निर्मला सुखदेव पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले व विविध विकास कामांची पाहणीही करण्यात आली.पाझर तलावाचे काम पूर्ण झाल्याने मांदळेवाडी व वाफगाव परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.मांदळवाडी परिसरातील नागरिकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ निर्मला सुखदेव पानसरे यांचे व शासनाचे याबाबत आभार मानले तसेच वापगाव येथे वापगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सोसायटी चेअरमन,व्हाइस चेअरमन,संचालक व सर्व सभासद यांच्यावतीने अध्यक्षा निर्मला ताई सुखदेव पानसरे अध्यक्ष यांचे हस्ते वाफगाव मधील भारतीय सैन्य दलातील जवानांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मांदळेवाडी व वाफगाव पंचक्रोशीतील माजी उपसरपंच अजय भागवत,विकास कराळे,संपत मांदळे, संदीप मांदळे,अमोल कराळे,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब इंगळे, दिलीप इंगळे,संकेत इंगळे,अमजद कुरणे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!