सरपंचनामा न्यूज:खा.डॉ.अमोल कोल्हेंच्या वैद्यकीय मदतीमुळे चिमुकलीची मोफत हृदय शस्त्रक्रिया

Spread the love

सरपंचनामा न्यूज|विवेक बच्चे(संपादक)
पुणे:हृदयाचा आजार असलेल्या जैनाब सय्यद नावाच्या अवघ्या १ वर्षे वयाच्या चिमुकलीची तातडीने हृदय शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.डॉ.अमोल कोल्हेंच्या वैद्यकीय मदतीमुळे चिमुकलीची मोफत हृदय शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.
चिमुकलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी पाच-सहा लाख खर्च अपेक्षित होता.पालकांच्या गरीब परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याची माहिती खा.डॉ.अमोल कोल्हे यांना समजल्यावर त्यांनी ताबडतोब पावले उचलली आणि पुण्यातील एम्स हॉस्पिटलच्या सहकार्याने या चिमुकलीची सुमारे ५ लाख ८० हजार रुपये खर्चाची अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया मोफत करून दिली.खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रियेनंतर चिमुकलीची व तिच्या पालकांची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची चौकशी केली.
खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी वेळेवर केलेल्या या वैद्यकीय मदतीबद्दल चिमुकलीच्या आई-वडिलांनी भावनिक होत कृतज्ञता व्यक्त केली.मतदारसंघातील गरजू नागरिकांना मदत करण्यास माझे नेहमीच प्राधान्य असल्याचे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!